रिडालोस तोंडघशी? 15 नावांची घोषणा
मुंबई, ता. 21 : रिपब्लिकन डाव्या लोकशाही समितीचा घटक पक्ष असलेल्या भाकपने विधानसभा निवडणुकीसाठी आज 15 उमेदवारांची घोषणा केली. यवतमाळच्या कलावती बांदूरकर यांना रिडालोसने काल पाठिंबा जाहीर करीत वणी मतदारसंघ सोडण्याची तयारी दर्शविली होती; मात्र भाकपने येथून कॉ. अनिल घाटे यांना उमेदवारी जाहीर केल्याने रिडालोसच्या नेत्यांवर तोंडघशी पडण्याची वेळ आली आहे.
यवतमाळमधील वणी मतदारसंघ विदर्भ जनआंदोलन समितीच्या पाठिंब्यावर उभ्या राहणाऱ्या कलावती बांदूरकर यांना देण्यास तयार असल्याचे रिडालोसच्या नेत्यांनी काल जाहीर केले होते. रविवारी घाईघाईत त्यांना नेत्यांनी पाठिंबा जाहीर केला. वणी मतदारसंघ कलावतींसाठी सोडण्याची विनंती "भाकप'ला करू, अशी ग्वाही नेत्यांनी दिली होती; मात्र आज भाकपने वणीतून कॉ. अनिल घाटे यांना उमेदवारी जाहीर करून रिडालोस नेत्यांना तोंडघशी पाडले. कलावती यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कॉंग्रेसवर गोळी झाडण्याच्या प्रयत्नात असलेल्या "रिडालोस'च्या नेत्यांना त्यामुळे चपराक बसली असून आता ते काय भूमिका घेणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत रिडालोस नेते आमदार जयंत पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की अजून आमची "भाकप'शी चर्चा झालेली नाही; मात्र या प्रश्नी तोडगा काढला जाईल.
भाकपचे आज जाहीर झालेले उमेदवार पुढीलप्रमाणे : धामणगाव- तुकाराम भस्मे, तिवसा- साबीर हुसेन, आर्वी- प्रा. राजू गोरडे, साकोली- चंद्रशेखर टेंभुर्णी, औरंगाबाद मध्य- अशफाक सलामी, शेवगाव- ऍड. सुभाष लांडे, भोसरी कॉ. सुकुमार दामले, चोपडा- मधुकर साळुंखे, शिरपूर- रामचंद्र पावरा, कोल्हापूर शहर- दिलीप पवार, पलूस-कडेगाव- डॉ. श्रीकांत जाधव, डोंबिवली- काळू कोमास्कर, चारकोप- अखिलेश गौड, शिवडी- कॉ. नारायण घागरे.
Wednesday, December 23, 2009
पक्षाच्या यशासाठी "त्यांनी' त्यागली पादत्राणे!
ंमुंबई, ता. 3 : सत्ता आणि पैसा यांच्याभोवती फिरणाऱ्या राजकारणात निष्ठावंत कार्यकर्ते दुर्मिळ झालेले असतानाच, मुंबईतील एका शिवसैनिकाने व मनसैनिकाने आपापल्या पक्षाच्या यशासाठी अनवाणी फिरण्याची प्रतिज्ञा करून अद्यापही पक्षनिष्ठेची बेटं कायम असल्याचे दाखवून दिले आहे. विधानसभा निवडणुकीतील यशासाठी अनेक उमेदवारांनी देव पाण्यात बुडवून ठेवले आहेत, तर दुसऱ्या बाजूला निष्ठावंत कार्यकर्त्यांनी नवस आणि प्रतिज्ञांचे अस्त्र घेऊन स्वतःला निवडणुकीच्या रणसंग्रामात झोकून दिले आहे.
शिवसेनेचे वरळी शाखाप्रमुख अरविंद भोसले यांनी, नारायण राणे यांचा पराभव झाल्याशिवाय पादत्राणे घालणार नाही, अशी भीष्मप्रतिज्ञाच केली आहे. महसूलमंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेला आव्हान देत केलेली बंडखोरी त्यांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. त्यांनी सांगितले, की ""कणकवलीच्या पोटनिवडणुकीत राणे यांच्या दहशतीचा सामना मी केला. त्यांची दहशत संपविण्याची शपथ मी घेतली आहे''.
शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मला नगरसेवकपदाची उमेदवारी देऊ केली होती; पण मी ती नाकारली. गेली दोन वर्षे मी अनवाणी फिरत आहे. माझी प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी मी कणकवलीचे तालुका संपर्कप्रमुखपद पक्षाकडे मागून घेतले.'' या वेळी कुडाळमध्ये राणे यांचा पराभव होईल आणि आपली प्रतिज्ञा पूर्ण होईल, अशी आशा भोसले व्यक्त करतात.
घाटकोपर येथील तृतीय पंथीयांच्या संघटनेचे अध्यक्ष जतिन यांनी, मनसेची सत्ता येईपर्यंत अनवाणी राहण्याची शपथ घेतली आहे. घाटकोपर (पश्चिम) येथील भटवाडीलगत राहणाऱ्या जतिन आणि त्यांचे गुरू रवींद्र साळवे यांना राज ठाकरे यांच्या मनसेची सत्ता यावी, असे मनोमन वाटते. जतिन यांनी राज यांची भेट घेऊन तृतीयपंथी आणि देवदासी यांच्या समस्या मांडल्या होत्या. जतीन सांगतात, की देवदासींना मासिक वेतन, रेशनकार्ड, मतदानाचा अधिकार देण्याचे आश्वासन राज यांनी दिले आहे. त्यामुळेच मनसेची सत्ता यावी, अशी आमची इच्छा आहे. आदिमाया शक्तीला यासाठी साकडे घातले असून, मनसेची सत्ता येईपर्यंत देवीला अभिषेक करणार नाही आणि पादत्राणे घालणार नाही, अशी प्रतिज्ञा या नवरात्रोत्सवात आपण केली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
..............................

आमदार बशीर पटेल यांचा राष्ट्रवादीला रामराम
मुंबई, ता. 24 : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बंडखोर आमदार बशीर पटेल यांनी आज नाट्यमय घडामोडींनंतर समाजवादी पक्षात प्रवेश केला असून समाजवादी पक्षातर्फे त्यांनी मुंबादेवी मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान, "सपा'चे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी 17 उमेदवारांची आज घोषणा केली.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमरखाडी येथील आमदार बशीर पटेल यांच्या मतदारसंघात पुनर्रचनेनंतर मोठा फेरबदल झाल्याने लगतच्या मुंबादेवी मतदारसंघातून उमेदवारी मागितली होती; मात्र त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारी न मिळाल्याने बंडाचे निशाण फडकावत ते "सपा'त दाखल झाले आहेत. कॉंग्रेसशी आघाडी असताना मंत्रिपदासाठी इच्छुक असणाऱ्या बशीर पटेल यांच्याऐवजी नवाब मलिक मंत्री झाल्याने नाराज झालेल्या पटेल यांनी समाजवादी पक्षाला अलविदा करून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता; मात्र या वेळी जागावाटपात उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी पुन्हा पक्ष बदलला आहे. मुंबादेवी मतदारसंघातून आज त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून ते आता तिसऱ्या आघाडीच्या पाठिंब्यावर लढणार आहेत.
समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी बशीर पटेल यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केल्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली. आमदार पटेल मात्र या वेळी उपस्थित नव्हते. आझमी यांनी "सपा'च्या 17 उमेदवारांची घोषणा केली. उमेदवार पुढीलप्रमाणे : नवापूर- संजय गवळी, सिंदखेड- विजयसिंग राजपूत, बाळापूर- डॉ. सुधीर ढोले, रिसोड- शिवा बंगी, मालेगाव- चंद्रशेखर देवरे, नाशिक मध्य- सय्यद मुशीर, कोपरी- पाचपाखाडी- रामनारायण यादव, दिंडोशी- श्रीकांत मिश्रा, वर्सोवा- चंगेश मुलतानी, कालिना- अहमद आझमी, वांद्रे (पश्चिम)- रिझवान मर्चंट, वांद्रे (पूर्व)- शब्बीर हुसेन, भायखळा- सर्फराज आरजू, मुंबादेवी- बशीर पटेल, इंदापूर- वसंत मोरे, चिंचवड- राम शरमाळे, कसबा पेठ- अनिल अहमद यांना उमेदवारी देण्यात आली असून उर्वरित उमेदवारांची घोषणा उद्या (ता. 25) करण्यात येणार असल्याचे आझमी यांनी सांगितले.
कॉंग्रेस आघाडी सरकारने अल्पसंख्याक दलितांवर अन्याय केला आहे. त्याचा जाब राज्यातील जनता कॉंग्रेसला निवडणुकीत विचारेल, असा विश्वास अबू आझमी यांनी व्यक्त केला.
.......

निपाणीहून बैलगाडी ओढत त्याने मुंबई गाठली
वाळव्यातील तरुण शेतकऱ्याचे अनोखे आंदोलन
मुंबई, ता. 18 : "निवडणुका आल्या की सत्ताधारी, राजकारणी शेतकऱ्याच्या, कष्टकऱ्यांच्या हिताचा गमजा मारतात; मात्र शेतकऱ्यांच्या पदरी काहीच पडत नाही. शेतात जीव ओतूनही हाती काही लागत नाही. शेतकऱ्यांच्या या व्यथेकडे मायबाप सरकारने लक्ष द्यावे "इडा-पिडा टळून बळीचे राज्य यावे', अशी इच्छा आहे ती बैलगाडी ओढत नऊ सप्टेंबरला 9 वाजून 9 मिनिटांनी निपाणीहून निघालेल्या वाळवा येथील साखराळे गावच्या विजय
जाधव या तरुण शेतकऱ्याची. विजय तब्बल नऊ दिवसांचा प्रवास करून आज मुंबईत दाखल झाला.
बारावीपर्यंत शिक्षण झालेल्या विजयने गावातच शेती करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालविण्याचा निर्णय घेतला. चार एकर उसाच्या शेतात त्याचे कुटुंब राबते; मात्र शेतात राबूनही हाती काहीच पडत नाही. शेतीचा खर्च वाढता असल्याने व शेतमालाला हमी भाव नसल्याने तोट्याची शेती किती काळ करायची, असा प्रश्न त्याला सतावतोय. विदर्भ, मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या करीत आहेत. कृषीप्रधान देशातील शेतकऱ्यांच्या या दुरवस्थेने व्यथित झालेल्या विजयने सरकारचे आणि शेतकऱ्यांच्या नावाने सत्तेच्या सिंहासनावर बसणाऱ्या राजकारण्यांचे डोळे उघडावेत, यासाठी ही अभिनव यात्रा काढली. तंबाखू उत्पादकांच्या आंदोलनात पोलिसांच्या गोळीबाराला बळी पडलेल्या निपाणी येथील शेतकऱ्यांच्या स्मारकाला अभिवादन करून विजयने आपल्या प्रवासाला सुरवात केली. दररोज 60 ते 70 कि.मी. गाडी ओढत चालण्याचा विजयने विक्रम केला. नऊ दिवसांत त्याने तब्बल 555 कि.मी. प्रवास केला. एवढ्या प्रवासाने त्याचे पाय सुजले होते. पायाच्या तळव्याला जखमा होऊन त्यातून ओघळणारे रक्तही सुकून गेले. गाडी ओढून खांद्याला जखमा झाल्या; मात्र विजयचा निर्धार तुटला नाही. त्याने मुंबई गाठलीच; मात्र मंत्रालयाकडे जाण्यापासून पोलिसांनीही त्याला रोखून धरले. परिणामी त्याला आझाद मैदानातच बसावे लागले. त्याच्या या यात्रेस महाराष्ट्र शेतकरी संघटनेने पाठिंबा दिला आहे.
शेतमालाचे भाव वास्तव उत्पादन खर्चावर आधारित व डॉ. एम. एस. स्वामिनाथन समितीच्या शिफारशीनुसार 50 टक्के नफा धरून शेतकऱ्यांना मिळावेत, समितीच्या अहवालाची तत्काळ अंमलबजावणी करावी, सार्वजनिक वितरणव्यवस्थेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होत असल्याने लाभार्थींना थेट सबसिडी द्यावी, शेतकऱ्यांना खतासाठी दिली जाणारी रक्कम त्यांच्या बॅंक खात्यात जमा करावी आदी मागण्या विजय जाधव याने कृषी खात्याच्या सचिवाची भेट घेऊन आज केल्या
..........

लोहा मतदारसंघात शह-काटशहाचे राजकारण
प्रताप चिखलीकरांना लोकभारतीची उमेदवारी
मुंबई, ता. 25 : मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे विरोधक आणि बंडखोर आमदार प्रताप चिखलीकर यांना लोकभारती पक्षाने लोहा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. लोकभारतीचे आमदार कपिल पाटील केंद्रीय अवजड उद्योगमंत्री विलासराव देशमुख यांचे खंदे समर्थक असून लोकभारती व चिखलीकरांच्या आडून कॉंग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्याने आजी मुख्यमंत्र्याला शह दिला आहे.
लोहा येथे आज अशोक चव्हाण यांच्या गाडीवर प्रताप चिखलीकर यांच्या समर्थकांनी दगडफेक केली. विलासराव देशमुख यांचे समर्थक असणारे चिखलीकर लोहातून कॉंग्रेसतर्फे इच्छुक होते; मात्र आघाडीच्या जागावाटपात हा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोडून चव्हाण यांनी चिखलीकरांचा पत्ता कापल्याची चर्चा आहे. आज लोकभारती पक्षातर्फे चिखलीकर यांनी लोहातून अर्ज दाखल केला. कपिल पाटील व चिखलीकर हे दोन्हीही मोहरे केंद्रीय अवजड उद्योग मंत्री विलासराव देशमुख यांचे खंदे समर्थक असून अशोक चव्हाण यांचे विरोधक आहेत. त्यामुळे लोहातील या राजकारणाला आजी - माजी मुख्यमंत्र्यांतील कुरघोडीचा वास असल्याची चर्चा आहे. लोहातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शंकरअण्णा धोंडगे लढत आहेत. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना स्थानिक पातळीवर शह देण्यासाठी कपिल पाटील यांनी चिखलीकर यांच्या पाठीशी तिसऱ्या आघाडीचे बळ उभे केले आहे. नांदेड महानगरपालिकेच्या निवडणुकीतही कपिल पाटील, चिखलीकर या जोडीने चव्हाण यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता.
रिपब्लिकन डावी लोकशाही समितीचा घटक पक्ष असणारा लोकभारती 12 जागा लढविणार आहे. पक्षाच्या 12 उमेदवारांची घोषणा कपिल पाटील यांनी केली. प्रताप चिखलीकर आणि वसंत जाधव या कॉंग्रेसच्या दोन बंडखोरांना लोकभारतीचे तिकीट बहाल केले. वसंत जाधव माहीम मतदारसंघातून लढणार आहेत. लोकभारतीतर्फे विक्रोळी - विनोद कांबळी, घाटकोपर (पश्चिम) - शरद कदम, रत्नागिरी - अभिजित हेगशेट्ये, नांदेड उत्तर - श्याम निलंगेकर, भोकरदन - भगवान लहाने, बेलापूर - सुकुमार किल्लेदार, वसई- दत्ता नर, करमाळा - ऍड. आजिनाथ शिंदे, बार्शी - नितीन भोसले, उल्हासनगर - साई बलराम यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
कपबशी चिन्हावर 55 उमेदवार लढणार
स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष आणि लोकभारती हे तिसऱ्या आघाडीतील घटक पक्षांचे 55 उमेदवार "कपबशी' या एकाच चिन्हावर निवडणूक लढणार असल्याचे लोकभारतीच्या वतीने सांगण्यात आले.
...........

गद्दारांचो बदला घेवूक कोकणात चला
ंमुंबई, ता. 28 : शिवसेनेचो विश्वासघात करणाऱ्या गद्दारांचो बदलो घेवची आणि बदल घडवूची वेळ इली आसा. शिवसैनिकांनी कोकणात गावाकडे जावून लोकांका जागवूक व्हया, असे आवाहन शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी आज केले. दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईत झालेल्या सिंधुदुर्गवासीय मुंबईकर शिवसैनिकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. महसूलमंत्री नारायण राणे यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात देण्याचा निर्धार शिवसैनिकांनी या वेळी केला.
कोकणातील गावा-गावातील मतांवर मुंबईकर चाकरमान्यांचा पगडा मोठा असतो. चाकरमान्यांचा शब्द सहसा खाली पडू दिला जात नाही. त्यामुळेच निवडणुका आल्या, की मुंबईतले चाकरमानी क्रियाशील होतात आणि आपल्या गावाशी संपर्क ठेवून असतात. विधानसभा निवडणूक शिवसेनेसाठी कोकणात मोठे आव्हान असल्याने मुंबईकर चाकरमानी सक्रिय झाले आहेत. मुंबईकर शिवसैनिकांनी शिवसेनेला सिंधुदुर्गात पूर्वीचे वैभव प्राप्त करून देण्याचा निर्धार केला आहे. नारायण राणे यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दहशत संपली आहे. या दहशतीचा पगडा झुगारून शिवसैनिकांनी काम करावे व गद्दाराला धडा शिकवावा, असे आवाहन शिवडी विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख गजानन चव्हाण यांनी केले.
राणे यांच्या राजकारणाला स्थानिक जनता विटली आहे. कोकणाला उद्ध्वस्त करणारे खाण प्रकल्प आणल्याने लोकांच्या मनात राग आहे. लोकांना जिल्ह्यात बदल हवा आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि खुद्द कॉंग्रेसमधील पदाधिकारी व कार्यकर्ते त्यांच्या विरोधात आहेत. या संधीचा फायदा घेऊन राणे यांना धडा शिकविण्याची वेळ आली आहे, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.
नारायण राणे यांच्या विरोधात कुडाळ मतदारसंघातून लढणारे वैभव नाईक व सावंतवाडीचे उमेदवार शिवराम दळवी यांना विजयी करण्याचा निर्धार या वेळी करण्यात आला. या वेळी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समाजकारणासाठी राजकारणात
समाजकारणासाठी राजकारणात आलो आहे. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यातील संवेदनशील माणूस पाहिला आणि त्यांचे हात बळकट करण्यासाठी राजकारणात आलो, असे माहीम येथील शिवसेनेचे उमेदवार अभिनेते आदेश बांदेकर यांनी या वेळी सांगितले. जिथे अन्याय दिसेल तेथे हा आदेश आक्रमक होईल, असे त्यांनी ठासून सांगितले.
-----------------------

आरिफ खान यांना हॅट्ट्रिकची संधी
ंमतदारसंघाच्या पुनर्रचनेत कुर्ला विधानसभा मतदारसंघाचा काही भाग मिळून चांदीवली मतदारसंघ तयार झाला आहे. पवई आय.आय.टी., पंचकुटी, हिरानंदानी, कुर्ला जरीमरी, मिलिंद नगर, असल्फा व्हिलेज आदी भाग या मतदारसंघात येतो. कुर्ला मतदारसंघातून कॉंग्रेसचे आरिफ नसीम खान दोन वेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. लोकसभा निवडणुकीतही येथील मतदारांनी कॉंग्रेसच्या पारड्यात मताचे दान भरभरून टाकले होते. हे पाहता, विधानसभा निवडणुकीतही येथे कॉंग्रेसचे पारडे जड राहण्याची शक्यता आहे.
कॉंग्रेसचे वर्चस्व असणारा कुर्ल्यातील बहुतांश भाग चांदीवली मतदारसंघात समाविष्ट झाला. त्यामुळे या वेळी आरिफ खान यांनी चांदीवलीतून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. 2004 च्या निवडणुकीत खान यांना एक लाख 19 हजार 612 मते मिळाली होती. एकूण मतांच्या 55.36 टक्के ही मते होती; तर शिवसेनेच्या दत्ताराम गुजर यांना एकूण मतांच्या 35.69 टक्के मते मिळाली होती. खान यांना या वेळी शिवसेनेच्या दत्ताराम गुजर या पारंपरिक उमेदवाराऐवजी नव्या दमाच्या उमेदवार चित्रा सांगळे यांचा सामना करावा लागणार आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे स्थानिक नगरसेवक दिलीप लांडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत मनसेला चांदीवलीत 25 हजार 368 मते मिळाली होती. शिवसेना-भाजप युतीच्या मतांच्या वाट्यात मनसे भागीदार झाल्याने युतीची लोकसभा निवडणुकीत युतीची पीछेहाट झाली. विधानसभा निवडणुकीतही याचीच पुनरावृत्ती घडेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत असून, त्याचा फटका शिवसेनेच्या उमेदवार सांगळे यांना बसण्याची शक्यता आहे. मनसे आणि शिवसेनेच्या काटाकाटीच्या राजकारणात कॉंग्रेसचा फायदा होण्याची चिन्हे आहेत. मनसेचे उमेदवार दिलीप लांडे हे स्थानिक नगरसेवक असल्याने ते लक्षणीय मते घेतील, असा अंदाज आहे.
रिपब्लिकन डावी लोकशाही समितीकडून सहदेव खटके यांनी आपले दंड थोपटले आहेत. खटके हेही नवखे उमेदवार आहेत. कॉंग्रेस आघाडीच्या विरोधात व दलित, अल्पसंख्याकांच्या हिताचा सूर आळवीत "रिडालोस'ने निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली आहे. मात्र येथील बहुसंख्य मुस्लिम, दलित मतदार हा कॉंग्रेसचा परंपरागत पाठीराखा आहे. शिवाय कॉंग्रेसचा उमेदवारही मुस्लिम समाजातील असल्याने "रिडालोस'चा कॉंग्रेसवर फारसा परिणाम होण्याची शक्यता दिसत नाही.
येथे बहुजन समाज पक्षानेही आपला उमेदवार दिला आहे; मात्र येथे खरा सामना कॉंग्रेस, मनसे व शिवसेना यांच्यातच होणार आहे. बसपने लोकसभा निवडणुकीत बऱ्यापैकी मते घेतली होती. त्यामुळे नसीम खान यांना बसप काही प्रमाणात उपद्रवी ठरेल, इतकेच. मतदारसंघात अनुसूचित जाती-जमातींचे सुमारे 20 हजार मतदार आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे पाच टक्के, तर अनुसूचित जमातीचे 0.61 टक्का मतदार आहेत. येथील निकाल फिरविण्याची ताकद मुस्लिम मतदारांमध्ये आहे. उत्तर भारतीय व अन्य समाजांचे मतदार मात्र तुलनेने कमी आहेत. या गोष्टी आणि कॉंग्रेसचा प्रभाव, मनसे फॅक्टर या बाबी लक्षात घेता, ही निवडणूक सध्या तरी कॉंग्रेससाठी सोपी असल्याचे दिसून येत आहे.
...................
चौकट :
एकूण मतदार
तीन लाख 46 हजार 866
पुरुष मतदार -
दोन लाख 7 हजार 971,
महिला -
ेएक लाख 38 हजार 835
------------------------------

आघाड्या आणि युतीला निळ्या झेंड्याचा आधार
मुंबई,ता.3 : रिपब्किन ऐक्याचे आणि रिपब्लिकन मतांच्या परिणामाची कोणी कितीही चेष्टा केली तरी रिपब्किन राजकारणाच्या निळ्या झेंड्याचा आधार घेतल्या शिवाय कोणत्याही राजकीय पक्षाला सुरक्षित वाटत नाही. असंख्य गटांमध्ये विभागलेल्या रिपब्लिकन चळवळीचे प्रतीक "निळा झेंडा'च असल्याने त्यातल्या कोणत्याही गटाने अध्याप वेगळा रंग घेतलेला नाही. त्यामुळे एखादा कार्यकर्ता आणि त्याचे लेटरहेड एवढ्याच बळावर खांद्यावर निळा झेंडा घेतलेला एखादा गट नेता तरी आपल्या सोबत असावा यासाठी सर्वच पक्षाचे प्रयत्न सुरू असतात. या निवडणुकीतही शिवसेनेसह सर्व पक्षांच्या प्रचार फेऱ्यांमध्ये निळा झेंडा दिसतो तो त्यामुळेच.
दलित आणि विशेषतः आंबेडकरी समाजाला सोबत घेतल्या शिवाय निवडणुकांचे राजकारण पूर्ण होऊ शकत नाही. पाच ते सहा टक्के मतदान असणाऱ्या या समाजाला वगळल्यास त्याच्या नाराजीचा फटका निवडणुकीत बसू शकतो. याची जाणीव कॉंग्रेस आघाडीसह शिवसेना- भाजप यांना सुद्धा आहे. त्यामुळेच लहान मोठ्या रिपब्लिकन गटांना सोबत घेऊन आपण सर्वसमावेशक राजकारण करीत असल्याचे दाखविण्याचा डाव्यांपासून उजव्यांपर्यंत प्रत्येकाचाच प्रयत्न असतो.त्यासाठी आपल्या आघाडी वा युतीसोबत निळा झेंडा नावापुरती का होईना पण हवा, असा प्रत्येकाचाच आग्रह असतो. त्याची तरतूद सर्व राजकीय पक्षांनी याही निवडणुकीत केली आहे.
रिपब्लिकन पक्षाला सोबत घेण्याची सुरूवात कॉंग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी केली. रिपब्लिकन पक्षाचे नेते दादासाहेब गायकवाड यांना त्यांनी सोबत घेतले. तेथूनच रिपब्लिकन पक्ष व कॉंग्रेसची सलगी झाली. पुढे . रिपब्किन चळवळीतील ज्येष्ठ नेते व बिहारचे राज्यपाल रा.सु. गवई यांनी कॉंग्रेसशी दोस्ती केली .ती आज ही आहे. राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रामदास आठवले यांना सोबत घेऊन यशवंतराव चव्हाण यांचा वारसा पुढे चालवला. रिपब्लिकन नेते दादासाहेब गायकवाड, गवई, ऍड. प्रकाश आंबेडकर, आठवले या मोठ्या नेत्यांनी कॉंग्रेसशी वेळोवेळी घरोबा केला.
यावेळी रामदास आठवले यांनी ऐक्याचा नारा दिल्याने सारे रिपब्लिकन गट निळ्या झेंड्याखाली एकत्रित राहतील अशी अपेक्षा होती मात्र याही ऐक्याची फाटाफूट झाली आणि रिपब्लिकन गट आपापल्यापरीने रिपब्लिकन पक्षाचे निळे झेंडे घेऊन कॉग्रेस आघाडी आणि युतीच्या तंबूत डेरेदाखल झाले.
ऐक्यातून फुटून डॉ. राजेंद्र गवई कॉंग्रेसच्या तंबूत शिरले . त्यामुळे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रचारसभा आणि रथावर पंजा आणि घड्याळासह रिपब्लिकनचा निळा झेंडा फडकू लागला. तर तानसेन ननावरे, अनिल कांबळे हे रिपब्लिकन नेते शिवसेनेच्या तंबूत शिरले. त्यामुळे युतीकडे शिवशक्ती- भिमशक्तीचा प्रयोग झाल अन् युतीलाही रिपब्लिकन पक्षाच्या निळ्या झेंड्याची सोय झाली. तिसऱ्या आघाडीसोबत आठवले, प्रा. जोगेंद्र कवाडे असल्याने सध्या या तीनही प्रमुख प्रतिस्पर्धी आघाड्यांकडे रिपब्लिकनचा "निळा झेंडा' ही एक कॉमन गोष्ट दिसते.
..............

कॉंग्रेस आघाडीतील बंडखोरांना रिडालोसची रसद
40 मतदारसंघांसाठी तिसऱ्या आघाडीकडे उमेदवारच नाहीत
मुंबई, ता. 6 : कॉंग्रेसच्या विरोधात हाळी देत विधानसभा निवडणुकीच्या रणमैदानात उतरलेल्या "रिडालोस'ने कॉंग्रेसच्या चार बंडखोर उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला आहे. विशेष म्हणजे जागावाटपाचा घोळ आणि घटक पक्षांच्या स्थानिक तडजोडी यामुळे रिडालोसला विधानसभेच्या 40 जागांवर उमेदवार उभे करण्यात अपयश आले आहे.
कॉंग्रेस आणि प्रस्थापित पक्षांच्या विरोधात "रिडालोस'ने दंड थोपटले आहेत. विधानसभेच्या 288 जागा लढण्याचे मनसुबे रिडालोसने आखले होते. मात्र काही घटक पक्षांनी स्थानिक पातळ्यांवर केलेल्या तडजोडीमुळे अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत जागावाटपाचा घोळ सुटला नाही. परिणामी राज्यातील 40 मतदारसंघात "रिडालोस'ला उमेदवार उभे करता आले नाहीत. यामध्ये राजुरा, वणी, कन्नड, बागलाण, येवला, धुळे ग्रामीण, सिंदखेड, जळगाव शहर, एरंडोल, जामनेर, मुक्ताईनगर, मलकापूर, खामगाव, अकोट, बाळापूर, रिसोड, मोर्शी, तुमसर, अमरावती, गडचिरोली, अहेरी, बोरिवली, दिंडोशी, भिवंडी ग्रामीण, भांडुप पश्चिम, जोगेश्वरी पूर्व, कांदिवली पूर्व, मलबार हिल, श्रीवर्धन, नेवासा, केज, औसा, उमरगा, कराड दक्षिण, शाहूवाडी, शिराळा, तासगाव- कवठेमहांकाळ, जत आणि वर्धा या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. रिपब्लिकन युनायटेडला 11 ठिकाणी; तर समाजवादी पक्षाला पाच मतदारसंघांत उमेदवारच मिळू शकले नाहीत. राष्ट्रीय समाज पक्षालाही चार जागांवर उमेदवार मिळू शकले नाहीत. त्यामुळे 17 पक्षांच्या या आघाडीला सर्व 288 जागांवर उमेदवार उभे करणे शक्य झाले नाही.
याची कसर भरून काढण्यासाठी रिडालोसने 10 जागांवर कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस व अन्य पक्षातील बंडखोरांना पाठिंबा जाहीर केला आहे. पक्षाच्या विरोधात शड्डू ठोकून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या कॉंग्रेसच्या बंडखोरांना रसद पुरवून कॉंग्रेसला शह देण्याचा प्रयत्न "रिडालोस'च्या नेत्यांनी केला आहे.
अमरावती मतदारसंघातील कॉंग्रेसचे बंडखोर व अर्थ राज्यमंत्री सुनील देशमुख यांना रिडालोसने पाठिंबा दिला आहे. राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे पुत्र रावसाहेब शेखावत यांना कॉंग्रेसने उमेदवारी दिल्याने देशमुख यांनी बंडाचे निशाण फडकावत कॉंग्रेसपुढे आव्हान निर्माण केले आहे. सिंदखेड मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी मंत्री हेमंत देशमुख यांच्यासह वर्धा येथील कॉंग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार सुरेश देशमुख आणि कॉंग्रेसचे माजी खासदार अनंतराव देशमुख यांना रिडालोसने पाठबळ पुरविले आहे. त्यामुळे या मतदारसंघात कॉंग्रेसच्या उमेदवारांसमोर आव्हान उभे ठाकले आहे. चाळीसगावमध्ये भाजपचे बंडखोर एम. के. अण्णा पाटील, कागलमधील संजय मंडलिक, कोल्हापूर दक्षिणमधील धनंजय महाडिक, इस्लामपूरमध्ये वैभव नायकवडी, बडनेरामध्ये रवी राणा; तसेच गडचिरोली, आदेरी, कराड दक्षिण येथील अपक्ष उमेदवारांनाही रिडालोसने पाठिंबा
.............

मतदारांची "कृपा' कॉंग्रेसवर?
कालिना विधानसभा मतदारसंघात या वेळी मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकर सिंह आणि शिवसेना-भाजप युतीचे ऍड. दीनानाथ तिवारी यांच्यात प्रमुख लढत होणार असून, मनसेच्या चंद्रकांत मोरे यांचे "रेल्वे इंजिन' युतीच्या मार्गात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कालिनामध्ये "कमळ' फुलण्याची शक्यता कमी आहे. कॉंग्रेसचे उमेदवार कृपाशंकर सिंह यांचा "हात' उत्तर भारतीय आणि झोपडीवासीयांच्या "साथ' राहिल्याने त्याचा फायदा कृपाशंकर यांना होणार आहे.
सांताक्रूझ विधानसभा मतदारसंघाचे विभाजन होऊन कालिना हा नवा मतदारसंघ अस्तित्वात आला. कॉंग्रेस आघाडीच्या जागावाटपात या मतदारसंघावर राष्ट्रवादीचे कामगारमंत्री नवाब मलिक यांनी दावा केला होता; मात्र दिल्लीतील वजन वापरून कृपाशंकर सिंह यांनी कालिनाची उमेदवारी मिळविली. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कृपाशंकर यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनली आहे. मतदारसंघात त्यांचा चांगला संपर्क आहे. त्यामुळे कृपाशंकर यांना विजयाची खात्री वाटत आहे.
कालिना मतदारसंघात उत्तर भारतीय, मुस्लिम आणि झोपडीवासीय मतदारांची संख्या जास्त आहे. हे लक्षात घेऊन भाजपनेही येथून ऍड. तिवारी यांच्या रूपाने अमराठी उमेदवार देऊन कृपाशंकर सिंह यांना शह दिला आहे. त्यामुळे येथे खरी टक्कर या दोन अमराठी उमेदवारांत होईल. ऍड. तिवारी यांचाही मतदारसंघात चांगला संपर्क आहे. उत्तर मध्य मुंबई जिल्हा भाजपचे ते अध्यक्ष आहेत. मृदू स्वभाव आणि मतदारांशी संवाद साधण्याच्या त्यांच्या कलेचा त्यांना फायदा होऊ शकतो. मनसेचा मराठी उमेदवार रिंगणात असल्याने येथील मराठी मते भाजपच्या पारड्यात किती पडतील, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
मनसेने लोकसभा निवडणुकीत पहिल्याच दणक्यात या मतदारसंघात 23 हजार 678 मतांची कमाई केली होती. विधानसभेतही हा प्रभाव कायम राहिल्यास त्याचा तडाखा युतीच्या उमेदवाराला बसेल. कॉंग्रेस आघाडी आणि युतीच्या अमराठी उमेदवारांसमोर चंद्रकांत मोरे यांना मनसेने आखाड्यात उतरविले आहे. दोन प्रमुख पक्षांचे उमेदवार अमराठी असल्याने मराठी मते "रेल्वे इंजिना'वर पडण्याची शक्यता आहे; मात्र या दोन उमेदवारांच्या तुलनेत मनसेचे मोरे यांचा राजकीय अनुभव कमी आहे. मतदासंघातील त्यांचा संपर्क कमी आहे. त्यामुळे आपले चिन्ह आणि चेहरा संपूर्ण मतदारसंघात पोहचविण्यासाठी त्यांना जास्त कष्ट करावे लागत आहेत. अमराठी भाषकांचा मतदारसंघ असल्याने त्यांच्या मराठी बाण्यालाही येथे प्रचारात हिंदीचा साज चढवावा लागला आहे. हिंदी भाषेतील प्रचारपत्रके वाटून त्यांना मतदारांना साकडे घालावे लागत आहेत.
एकूणच येथील अमराठी मतदारच निकाल ठरविणार असून, त्यामुळे कॉंग्रेसला विजयाची अधिक संधी दिसते.
झोपडपट्टी पुनर्वसन आणि पावसाळ्यात कालिना परिसरात भरणारे पाणी आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळशेजारील झोपडीवासीयांचे पुनर्वसन आदी प्रमुख प्रश्न या मतदारसंघात आहेत.
......
कालिना विधानसभा मतदारसंघ
पुरुष - 142798
स्त्री - 110245
एकूण - 253058

निवडणुकीच्या आखाड्यात 588 गुन्हेगार
मुंबई, ता. 10 : राजकारणात गुन्हेगारांची वाढती संख्या आणि धनिकांच्या हाती जाणाऱ्या सत्तेच्या चाव्या याबाबत चिंता व्यक्त केली जात असतानाच राज्याच्या विधानसभा निवडणुकीत हेच चित्र निर्माण झाले आहे. विधानसभेच्या 288 मतदारसंघांतील तब्बल 588 उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत. मुंबई आणि उपनगरातील सर्वाधिक 87 उमेदवारांचा यात समावेश आहे; तर 461 करोडपती उमेदवार जनतेकडे मतांचे "दान' मागत आहेत. नॅशनल इलेक्शन वॉच या संस्थेने आज प्रसिद्ध केलेल्या पाहणी अहवालातून ही माहिती पुढे आली आहे.
एनईडब्ल्यू आणि सहकारी संस्थांनी राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघांतील उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रांच्या अधारे ही पाहणी केली आहे. या पाहणीत अनेक धक्कादायक गोष्टी पुढे आल्या आहेत. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसपेक्षा शिवसेना, भाजप आणि मनसे वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल असणाऱ्या व्यक्तींना उमेदवारी देण्यात आघाडीवर आहेत. शिवसेनेच्या 153 उमेदवारांपैकी 98 उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत; तर भाजपच्या 114 पैकी 66, मनसेच्या 141 पैकी 81 उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत. या पक्षांच्या तुलनेत कॉंग्रेस आघाडी मात्र पिछाडीवर आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या 112 पैकी 40 आणि कॉंग्रेसच्या 164 पैकी 56 उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत; तर गुन्हेगारांना उमेदवारी देण्याबाबत चर्चेत राहणाऱ्या "बसप'च्या 276 उमेदवारांपैकी 47 उमेदवारांवर विविध गुन्हे आहेत.
करोडपतींमध्ये कॉंग्रेसचा वरचष्मा
करोडपती उमेदवारांमध्ये कॉंग्रेस आघाडीवर आहे. राज्यात एकूण 461 करोडपती मतांचे "दान' मिळविण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. कॉंग्रेसचे 103, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 83, भाजपचे 59, मनसेचे 34, शिवसेनेचे 69, बसपचे 17 करोडपती निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण उमेदवारांपैकी 58 टक्के उमेदवार करोडपती आहेत.
उच्च शिक्षणाच्या बाबतीत मात्र सर्व पक्षांच्या उमेदवारांची बोंब आहे. केवळ 36 टक्के उमेदवार पदवीधर आहेत. 580 उमेदवारांचे दहावीपर्यंतही शिक्षण झालेले नाही; तर 1029 उमेदवारांकडे स्वतःचे पॅनकार्ड नसल्याचे पाहणीत उघड झाल्याचे नॅशनल इलेक्शन वॉचच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
..................

उमेदवारांनी घेतली विश्रांती निकालाच्या अंदाजासाठी काथ्याकूट
मुंबई, ता. 14 : गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेली निवडणुकीची धामधूम काल मतदानानंतर थंडावली आणि राजकीय ताणतणावाखाली वावरणाऱ्या उमेदवारांनी पहिला अध्याय संपल्याने आज हुश्श म्हणत सुटकेचा निःश्वास सोडला. कोणी निवांत झोप घेतली, कोणी स्वीमिंगला गेले; तर कोणी मासळीबाजारात जाऊन मासे आणले. महिला उमेदवारांनी दिवाळीच्या फराळाला हात घातला. निकालाचा काथ्याकूट आणि कार्यकर्त्यांचे आभार मानण्यासही उमेदवार विसरले नाहीत.
राजकीय आघाड्या, व्यूहरचना, प्रचारसभा, कार्यकर्त्यांच्या बैठका, शह-काटशह यामुळे नेते आणि उमेदवारांच्या डोक्याचा अक्षरशः भुगा झाला होता. झोप आणि जेवणाचे तीन-तेरा वाजले. मतदारसंघात पदयात्रा काढून उमेदवारांचे जोडे झिजले. प्रचारसभा आणि कार्यकर्त्यांच्या बैठकांमध्ये भाषणे ठोकून घशाला कोरड पडली; तर मतदारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना नाकीनऊ आले. राजकीय पक्षांचे प्रमुख नेते पायाला भिंगरी बांधून राज्यभर फिरले. या साऱ्या धावपळीमुळे त्यांची चांगलीच दमछाक झाली. मंगळवारी मतदानानंतर जनमताचा कौल आणि उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रात बंद झाले आणि नेत्यांची धावपळ थांबली.
दिवाळीनंतर निकालाचा फटाका फुटणार असल्याने त्याची धाकधूक सर्वच उमेदवारांना असली, तरी गेल्या महिनाभराच्या धावपळीतून त्यांना आज मिळालेला निवांतपणा त्यांनी सत्कारणी लावला. त्यामुळे आज ते रिलॅक्स होते. मनसेचे विलेपार्लेतील उमेदवार शिरीष पारकर यांनी आज मासळी बाजार गाठला. मुलीला शाळेत सोडले आणि दूरध्वनीवरून कार्यकर्त्यांचे आभार मानले. त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांनी मात्र दिवसभर मतदारसंघात जाऊन कार्यकर्त्यांना धन्यवाद दिले. निकालाचा अंदाज घेतला. कॉंग्रेसचे उमेदवार कृष्णा हेगडे यांनी स्वीमिंगला जाऊन ताण कमी करण्याचा प्रयत्न केला आणि रात्री कुटुंबासमवेत डीनरचा बेत आखला.
नबाव मलिक रमले कुटुंबात
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अणुशक्तीनगरमधील उमेदवार व कामगार मंत्री नवाब मलिक यांनी आपला वेळ आज लहानग्या नातवाला दिला. त्याच्याशी ते मनसोक्त खेळण्यात रमले. त्यानंतर कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले. सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी मात्र कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांना धन्यवाद दिले. त्यांनी झालेले मतदान आणि निकालांची आकडेमोड केली. भाजपचे मलबार हिलचे उमेदवार मंगलप्रभात लोढा यांनी देवदर्शन केले. वांद्रे पूर्वचे उमेदवार बाळा सावंत, भांडुपचे उमेदवार सुनील राऊत यांनी सकाळी विश्रांती घेऊन दुपारी मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या. वांद्रे पूर्वच्या मनसेच्या उमेदवार शिल्पा सरपोतदार यांनी मात्र दिवाळीच्या स्वागतात स्वतःला झोकून दिले आणि बाहेरची लढाई संपवून त्या घरच्या आघाडीवर रुजू झाल्या.
दिवाळी तोंडावर आल्याने काही उमेदवारांनी "होम मिनिस्टरला' वेळ देत दिवाळीत गोडवा कायम राखण्याचा प्रयत्न केला. बहुतांशी उमेदवारांनी आजचा दिवस कुटुंबासोबत घालवला. काहींनी निवांत झोप घेणे पसंत केले; तर काही नेत्यांनी घराबाहेर जाण्याचे टाळत कार्यकर्त्यांना घरीच बोलावून निकालाचा अंदाज घेण्यासाठी आकड्यांची उलटसुलट मांडणी केली. आपापल्या मतदारसंघांत झालेले मतदान, मतदानाला बाहेर पडलेले नागरिक, कोणत्या पॉकेटमध्ये किती प्रतिसाद मिळाला, त्याचा निकालावर काय परिणाम होईल याचा प्रमुख कार्यकर्त्यांसोबत काथ्याकूट करीत निकालाचा अंदाज घेतला. प्रसारमाध्यमे आणि काही संस्थांनी वर्तवलेल्या जनमत चाचण्यांचा अंदाज घेत स्वतःची गणिते मांडण्यात धन्यता मानली.

अबू आझमींना विजयाची दुहेरी लॉटरी
मुंबई, ता. 22 : मी मी म्हणणाऱ्या काही बड्या नेत्यांना आज मतदारांनी घरी बसवले; तर काहींना विजयाने थोडक्यात हुलकावणी देत त्यांची सत्त्वपरीक्षा घेतली. मात्र समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू असीम आझमी यांना मात्र भिवंडी पूर्व आणि मानखुर्द-शिवाजीनगर या दोन्ही मतदारसंघात विजयाची लॉटरी लागली असून "भगवान देता है तो छप्पर फाडके' या म्हणीचा प्रत्यय त्यांना आला. दरम्यान, आझमी यांना एका मतदारसंघावर पाणी सोडावे लागणार असल्याने येथे पोटनिवडणूक अटळ आहे.
लोकसभा निवडणुकीत मुंबईतून नशीब अजमावणारे माजी खासदार अबू आझमी आज दोन मतदारसंघांतून निवडून आले. लोकसभेत हुलकावणी देणारे त्यांचे नशीब विधानसभा निवडणुकीत फळफळले आहे. रिपब्लिकन डावी लोकशाही समितीच्या पाठिंब्यावर भिवंडी पूर्व आणि मानखुर्द शिवाजीनगर या मुस्लिम बहुल मतदारसंघातून रिंगणात उतरण्याचा सेफ गेम अबू आझमी खेळले होते. या दोन्ही मतदारसंघातील मतदारांनी आझमी यांच्या पारड्यात भरभरून मतांचे दान टाकले. भिवंडी पूर्व मतदारसंघात आझमी यांनी 17 हजार 981 मतांनी प्रतिस्पर्धी कॉंग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला; तर मानखुर्द येथे 14 हजार 117 एवढे मताधिक्य मिळवून त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांना चीतपट केले. समाजवादी पक्षाला नवापूर आणि भिवंडी या अन्य दोन जागांवर विजय मिळाल्याने विजयाचा आनंद द्विगुणित झाला आहे.
पोटनिवडणूक होणार
भारतीय संविधानातील तरतुदीनुसार आझमी यांना एकाच मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करता येईल. त्यामुळे त्यांना भिवंडी किंवा शिवाजीनगर मतदारसंघावर पाणी सोडावे लागणार आहे; त्यामुळे तेथे पोटनिवडणूक घ्यावी लागणार आहे. याबाबत राज्याचे सह मुख्य निवडणूक अधिकारी शेखर चन्ने यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आझमी यांनी कोणत्याही एका मतदारसंघातून राजीनामा सादर केल्यानंतर तेथे पोटनिवडणूक घेण्यात येईल, असे सांगितले.

विलेपार्ल्यात कॉंग्रेसचा निसटता विजय
मनसेने खोडा घातल्याने शिवसेना तोंडघशी
ंमुंबई, ता. 22 : उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघातील विलेपार्ले विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेसचे कृष्णा हेगडे यांना निसटता विजय मिळाला असून, शिवसेनेचे विनायक राऊत यांचा 1704 मतांनी पराभव झाला. कॉंग्रेसला कडवी झुंज देणाऱ्या राऊत यांना लोकसभा निवडणुकीप्रमाणेच याही वेळी मनसेमुळेच एकप्रकारे धोबीपछाड खावी लागली. त्यामुळे हा पराभव शिवसेनेच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे.
लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसने विलेपार्ले मतदारसंघात नऊ हजारांहून अधिक मतांची आघाडी घेतली होती. या वेळी मात्र कॉंग्रेसच्या कृष्णा हेगडे यांना 1704 मतांच्या आघाडीवर समाधान मानावे लागले. दहाव्या फेरीपर्यंत विनायक राऊत आणि हेगडे यांच्यात पाठशिवनीचा खेळ सुरू होता. कधी हेगडे, तर कधी राऊत आघाडीवर राहत असल्याने दोन्ही पक्षांच्या समर्थकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. राऊत यांनी सुरुवातीच्या काळात घेतलेल्या आघाडीमुळे ते निसटती बाजी मारणार असे वाटत असतानाच हेगडे यांनी प्रत्येक फेरीत दोन हजार मतांची कमाई करीत 11 व्या फेरीत आघाडी घेतली. राऊत यांच्या पारड्यातील मते कमी होत असतानाच शिरीष पारकर यांच्या पारड्यातील मते वाढत गेली. शेवटच्या दोन फेऱ्यांपर्यंत रंगतदार ठरलेल्या या लढाईत अखेर कॉंग्रेसने बाजी मारली.
हेगडे यांना 44 हजार 338 मते मिळाली, तर राऊत यांना 42 हजार 634 मतांवर समाधान मानावे लागले. मनसेचे पारकर यांनीही मतांची जोरदार कमाई करीत एकप्रकारे कॉंग्रेसच्या विजयाला हातभारच लावला. पारकर यांना 35 हजार 156 मते मिळाली. मनसे आणि शिवसेना यांच्या भांडणात कॉंग्रेसने बाजी मारली. मनसेमुळे झालेला हा पराभव शिवसैनिकांच्या जिव्हारी लागल्याचे चित्र होते. हेगडे यांना विजयी घोषित करताच मतदान केंद्राबाहेर जमलेल्या कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करीत परिसर दणाणून सोडला.
-------------------

मुंबईत रिडालोसचे पानिपत
रिपब्लिकनची पाटी कोरी; आठवलेंच्या नेतृत्वाचा फुगा फुटला
मुंबई, ता. 22 : विविध एक्झिट पोलचे अंदाज चुकवीत रिपब्लिकन डाव्या लोकशाही समितीने 11 जागांवर विजय मिळविला आहे; मात्र मुंबईत रिडालोसचे पुरते पानिपत झाले. रिडालोसचा सर्वात मोठा घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन युनायटेडला एकही जागा मिळवता आली नाही. त्यामुळे माजी खासदार व रिडालोसचे निमंत्रक रामदास आठवले यांच्या नेतृत्वाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
समाजवादी पार्टी आणि शेतकरी कामगार पक्षाची कामगिरी या वेळी उंचावली आहे. अलिबाग मतदारसंघातून शेकापच्या मीनाक्षी पाटील, उरणमधून विवेक पाटील, सांगोलातून गणपतराव देशमुख, पेणमधून धैर्यशील पाटील विजयी झाले असून, पनवेलची जागा मात्र शेकापला राखता आली नाही. भिवंडी-पूर्व व शिवाजीनगर येथून समाजवादी पक्षाचे अबू आझमी आणि भिवंडीतून रशीद मोमीन व शरद गावीत यांनी नवापूर मतदारसंघात विजय मिळविला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पश्चिम महाराष्ट्रात निर्माण केलेली हवा फारशी टिकली नाही. केवळ पंढरपूर मतदारसंघात "स्वाभिमानी'च्या भारत भालके यांना विजय मिळाला; स्वाभिमानीला इतर ठिकाणी अपयश आले.
भाकपच्या डहाणू येथील राजाराम ओझरे यांना विजय मिळाला; तर आमदार जीवा पंडू गावीत व आमदार नरसय्या आडम यांना पराभवाचा धक्का बसला आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे बाबासाहेब पाटील हे अहमदपूरमधून विजयी झाले आहेत. रिडालोसने पाठिंबा दिलेले बार्शीतून दिलीप सोपल, वर्ध्यातून सुरेश देशमुख, माळशीरमधून उत्तम जाणकर यांनी विजयश्री खेचून आणली.
रिपब्लिकनची पाटी कोरीच
रिडालोसमधील सर्वात मोठा घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन युनायटेडला आपले खातेही खोलता आले नाही. रिपब्लिकनने 107 जागांवर उमेदवार उभे केले होते. मुंबई आणि उपनगरातील बहुतांशी जागांवर रिपब्लिकनचे उमेदवार उभे होते; मात्र त्यांना तिसरा क्रमांकही गाठता आला नाही. सर्वच ठिकाणी त्यांना मतदारांनी अस्मान दाखविले. गाजावाजा करीत झालेल्या रिपब्लिकन ऐक्यावर दलित मतदारांनी विश्वास दाखविलेला नाही. कॉंग्रेसला धडा शिकविण्याची भाषा करणाऱ्या माजी खासदार रामदास आठवले यांच्यासह सर्वच रिपब्लिकन नेत्यांना आत्मपरीक्षण करावे लागणार आहे. "पैसा आणि वेळ कमी पडल्याने रिडालोसला यश मिळाले नाही', अशी प्रतिक्रिया रामदास आठवले यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. जनतेला तिसरा पर्याय देण्याची भाषा करणाऱ्या रिडालोसला मनसेएवढेही यश मिळविता आले नाही.
बसपला नाकारले
मायावतींच्या बहुजन समाज पक्षालाही खाते खोलता आले नाही. मुंबईवर बसपने लक्ष केंद्रित केले होते; मात्र बसपच्या पदरी निराशाच पडली आहे. मायावतींच्या हत्तीला महाराष्ट्राच्या जनतेने नाकारले आहे.

"रेल्वे इंजिना'च्या धडकेने शिवसेना "जायबंदी'
उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेस आघाडीने विजय मिळविला आहे, तर कॉंग्रेसचे आमदार जनार्दन चांदुरकर यांचा पराभव करीत शिवसेनेचे नगरसेवक बाळा सावंत यांनी वांद्रे पूर्व मतदारसंघात युतीचा भगवा फडकावला व युतीची लाज राखली. कालिना मतदारसंघातून गृहराज्यमंत्री (शहर) नसीम खान यांनी दणदणीत विजय मिळवीत हॅट्ट्रिक साधली आहे. अन्य मतदारसंघात मात्र कॉंग्रेसला युती आणि मनसेच्या उमेदवारांनी कडवी झुंज दिली. मनसेच्या "रेल्वे इंजिना'ने युतीला धडक दिल्याने युतीवर जायबंदी होण्याची पाळी आली.
लोकसभा निवडणुकीत उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात मोठे मताधिक्य संपादन करीत कॉंग्रेसने लोकसभा निवडणुकीत निर्माण केलेला वरचष्मा कायम राखला आहे. कॉंग्रेसचे चार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचा एक आणि शिवसेनेचा एक असे बलाबल या लोकसभा मतदारसंघात तयार झाले आहे.
आघाडीने जिंकलेल्या पाचपैकी वांद्रे-पश्चिम आणि विलेपार्ले या जागा निसटत्या मतांच्या फरकाने आल्या. युती आणि मनसेच्या उमेदवारांची एकत्रित मते आघाडीच्या विजयी उमेदवारांपेक्षा अधिक आहेत. मनसे व युती एकत्रित असते, तर चांदिवली वगळता अन्य मतदारसंघात चित्र काही वेगळेच दिसले असते.
विलेपार्लेत हेगडेंचा निसटता विजय
मुंबई कॉंग्रेसचे प्रवक्ते कृष्णा हेगडे आणि शिवसेना सचिव विनायक राऊत यांच्यात "कॉंटे की टक्कर' अपेक्षित होती. मनसेचा फटका राऊत यांना बसेल असा होरा होता. घडलेही तसेच. अटीतटीच्या लढतीत कृष्णा हेगडे यांचा 1 हजार 704 मतांनी निसटता विजय झाला. राऊत यांना 42 हजार 634 मते मिळाली. मनसचे उमेदवार शिरीष पारकर यांनी 35 हजार 156 मतांची कमाई केली. ते तिसऱ्या स्थानावर राहिले. राऊत आणि पारकर यांच्यात मराठी मतांचे विभाजन झाल्याने राऊत यांना तिसऱ्यांदा पराभवाचे पाणी चाखावे लागले. स्थानिक शिवसैनिक पदाधिकाऱ्यांच्या नाराजीचा सामना करीत राऊत यांनी चांगली लढत दिली होती. मात्र रेल्वे इंजिनाचा धक्का बसल्याने राऊत तोंडघशी पडले; तर विजयाचा दावा करणारे शिरीष पारकर यांनी कॉंग्रेसच्या विजयात हातभार लावला. मात्र लोकसभेच्या तुलनेत मनसेने या वेळी येथून जास्त मतांची कमाई केली आहे.
"वांद्रे-पश्चिमे'त सिद्दीकींची दमछाक
या मतदारसंघातून कॉंग्रेसच्या बाबा सिद्दीकी यांचा विजय मोठ्या फरकाने होईल, असे वाटत होते; मात्र भाजपच्या आशीष शेलार यांनी त्यांना चांगले झुंजविले. त्यामुळे केवळ 1 हजार 691 मतांची सिद्दीकी यांना आघाडी मिळाली. वांद्रे पश्चिम हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला आहे; मात्र शेलार यांनी सिद्दीकी यांची दमछाक केली. मनसेचा उमेदवार या मतदारसंघात नव्हता. त्यामुळे कॉंग्रेस आणि भाजप यांच्यात सरळ लढत झाली. लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला मिळालेली आघाडी कायम राखण्यात सिद्दीकी यांना यश मिळाले आहे.
"वांद्रे-पूर्व'मध्ये भगवा
लगतच्या मतदारसंघात हाराकिरी होत असताना शिवसेनेच्या प्रकाश ऊर्फ बाळा सावंत यांनी वांद्रे पूर्वमध्ये विजयश्री खेचून आणली. त्यामुळे शिवसेनाप्रमुखांचे निवासस्थान असलेल्या "मातोश्री'चा अंतर्भाव असलेल्या मतदारसंघात शिवसेनेचा भगवा फडकला. बाळा सावंत यांच्या समोर मनसेच्या शिल्पा सरपोतदार यांचे आव्हान प्रामुख्याने होते. मात्र मनसेला मात देत सावंत यांनी भगवा फडकावला आहे. सन 2004 च्या विधानसभा निवडणुकीत यशाने त्यांना हुलकावणी दिली होती. या वेळी मात्र त्यांनी जनार्दन चांदुरकर यांचा पराभव करून वचपा काढला. त्यांना 7 हजार 420 एवढे मताधिक्य मिळाले. मनसेच्या शिल्पा सरपोतदार या तिसऱ्या स्थानावर फेकल्या गेल्या असून त्यांना 19 हजार 109 मते मिळाली आहेत. लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीत शिल्पा सरपोतदार यांना अपयशाचा सामना करावा लागला.
कालिनात मनसेचे आव्हान
कालिना मतदारसंघात मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांनी 12 हजार 921 मतांनी विजय मिळवला आहे. मनसेच्या चंद्रकांत मोरे या नवख्या उमेदवाराने त्यांना अनपेक्षित लढत दिली. कॉंग्रेस आणि युती यांच्यात प्रामुख्याने लढत होईल, असे मानले जात होते. मात्र भाजपचे उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष दीनानाथ तिवारी हे तिसऱ्या स्थानावर फेकले गेले. त्यांना अवघी 13 हजार 994 मते मिळाली आहेत; तर मनसेच्या मोरे यांनी 38 हजार 284 मते मिळवली आहेत. कृपाशंकर सिंह यांचा येथील उत्तर भारतीयांशी असलेला संपर्क आणि कॉंग्रेसचे वर्चस्व पाहता कृपाशंकर यांना मोठ्या मताधिक्याची अपेक्षा होती. मात्र मनसेने त्याच्या विजयी वारूचा वेग रोखून धरला. धरला त्यामुळे त्यांना अपेक्षित मताधिक्य मिळवता आले नाही.
चांदिवलीवर कॉंग्रेसची पकड
कुर्ला मतदारसंघातून आतापर्यंत दोन टर्म विधानसभेवर धडक देणाऱ्या गृहराज्यमंत्री नसीम खान यांनी या वेळी मतदारसंघांच्या पुनर्रचनेत नव्याने तयार झालेल्या चांदिवली मतदारसंघातून मनसेच्या दिलीप लांडे यांचा 33 हजार 715 मतांनी पराभव करीत विजयाची हॅट्ट्रिक साधली. त्यांचा हा विजय एकतर्फी मानला जात आहे. नसीम खान यांना 82 हजार 616 मते मिळाली आहेत. दिलीप लांडे यांना 48 हजार 901 मते मिळाली. शिवसेनेने मात्र येथे हाराकिरी केली. सेनेच्या उमेदवार चित्रा सांगळे यांना 22 हजार 782 मते मिळाली आहेत. नसिम खान यांची मतदारसंघावरील पकड यामुळे अधिकच घट्ट झाली आहे; तर मनसेला मिळालेली मते उत्साहवर्धक आहेत. सेनेला मात्र आपले अस्तित्व टिकवण्यासाठी पुढील काळात धडपडावे लागणार आहे.
"कुर्ल्या'त राष्ट्रवादीला लाभ
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार अनिल कांबळे यांनी कुर्ला मतदारसंघात शिवसेनेच्या मंगेश कुडाळकर यांचा 6 हजार 971 मतांनी पराभव केला. त्यांना 41 हजार 891 मते मिळाली असून कुडाळकर यांना 34 हजार 920 मते मिळाली. शिवसेनेच्या विजयाचा मार्ग येथे मनसेने रोखून धरला. मनसे आणि सेनेच्या उमेदवारांची मते पाहता हे चित्र स्पष्ट होते. मनसेच्या सदाशिव लोखंडे यांनी 33 हजार 967 मतांची कमाई केली. मनसे आणि शिवसेनेच्या भांडणात राष्ट्रवादीचा लाभ झाला. कुर्ला मतदारसंघ राखीव झाल्याने कामगार मंत्री नवाब मलिक यांच्याऐवजी या मतदारसंघाचा वारसा अनिल कांबळे यांच्याकडे आला. कांबळे यांनी पहिल्याच प्रयत्नात विजयश्री मिळवली आहे. "मनसेला मत म्हणजे कॉंग्रेसला मत' या शिवसेनेच्या प्रचाराला मराठी मतदारांनी केराची टोपली दाखवली आहे. बहुतांश मतदारसंघात शिवसेनेची पीछेहाट झाली असून आपले अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड करावी लागणार आहे.

रिडालोसच्या गटनेतेपदी गणपतराव देशमुख?
ंमुंबई, ता. 26 : "रिपब्लिकन डावी लोकशाही समिती'च्या विधिमंडळ गटनेतेपदी शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते व सांगोल्याचे विद्यमान आमदार गणपतराव देशमुख यांची निवड होण्याची शक्यता आहे. "रिडालोस'च्या घटक पक्षांची उद्या (ता. 27) मुंबईत गटनेता निवडीसाठी बैठक होणार असून, यामध्ये देशमुख यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची होणार आहे.
विधानसभेच्या 248 जागा लढविणाऱ्या रिडालोसला 11 जागांवर विजय मिळाला. यामध्ये समाजवादी पक्षाच्या तीन, शेतकरी कामगार पक्षाच्या चार, राष्ट्रीय समाज पक्षाची एक, स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रहार संघटना, माकप यांच्या प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे. अन्य दोन जागांवर समितीने पाठिंबा दिलेले अपक्ष निवडून आले आहेत. गणपतराव देशमुख गेली 37 वर्षे विधिमंडळात निवडून आले आहेत. विधिमंडळात लोकांच्या प्रश्नावर त्यांची मुलूखमैदान तोफ धडाडली आहे. 1967 मध्ये ते आमदार झाले. 1995 ते 99 हा कालावधी वगळता ते आजपर्यंत लोकप्रतिनिधी म्हणून सभागृहात निवडुन आले आहेत. एक अभ्यासू आमदार म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यामुळे गणपतराव देशमुख यांचेच नाव गटनेतेपदासाठी आघाडीवर आहे. रिडालोसच्या घटक पक्षात सर्वात जास्त जागा शेकापने पटकावल्या असल्याने गटनेतेपद शेकापकडे राहण्याची शक्यता आहे.
चौकट
रिडालोसला 30 लाख 70 हजार मते
अठरा घटक पक्षांच्या रिडालोसच्या बाजूने राज्यातील 30 लाख 70 हजार 34 मतदारांनी मतदान केले असल्याचे स्पष्ट झाले आहे. सपाला 0.74 टक्के, माकपला 0.60 टक्के, जनता दल सेक्युलरला 0.19 टक्के, भाकपला 0.14 टक्के मते मिळाली आहेत.

हिंदीतूनच शपथ घेणार : अबू आझमी
मुंबई, ता. 2 : नवनिर्वाचित आमदारांनी मराठीतून शपथ घ्यावी; अन्यथा त्यांना मनसेच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज दिला असतानाच समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी मात्र आपण हिंदी भाषेतूनच आमदार म्हणून शपथ घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे ठाकरे आणि आझमी यांच्यातील धुमश्चक्रीत भर पडणार आहे.
नवनिर्वाचित आमदार अबू आझमी यांच्या हिंदी प्रेमावर मनसेने कडवट टीका केली आहे. या पर्श्वभूमीवर आझमी यांनी आपण मुंबईत 40 वर्षे राहत असून विधानसभेत निवडून आल्यामुळे मराठी भाषेचे धडेही गिरवणार असून मराठीला स्वप्नातही विरोध करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
विधिमंडळाच्या कामकाजाची माहिती इंग्रजी, मराठीप्रमाणे हिंदी भाषेतून मिळावी, अशी मागणी अबू आझमी यांनी विधिमंडळाच्या मुख्य सचिवांची भेट घेऊन नुकतीच केली होती. आमदार म्हणून शपथही हिंदीतूनच घेणार असल्याची घोषणा या वेळी त्यांनी केली होती. त्यामुळे मनसेला पुन्हा एकदा आंदोलनाचा आयता विषय मिळाला. आझमींच्या लाठ्याकाठ्या वाटपाच्या वक्तव्याने यापूर्वी मनसेच्या हाती आयते कोलीत दिले होते. आझमींच्या नव्या मागणीवर बोलताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी "आझमी यांनी उत्तर प्रदेशातील आझमगडमध्ये चालते व्हावे', असे सुनावले आहे.
मराठी भाषेबद्दल आदर असल्याचे सांगत आझमी यांनी मराठीचे गोडवे गायला सुरुवात केली आहे. हिंदी ही राष्ट्रभाषा आहे. राष्ट्रभाषेतून शपथ घेण्याची घटनेत तरतुद आहे. त्यामुळे आपण हिंदीतून शपथ घेणार असल्याचे त्यांनी नमुद केले.
"हिंदी ही राष्ट्रभाषा आहे. या भाषेच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता साधली जावी, हा आपल्या मागणीमागील हेतू होता; मात्र त्याचा विपर्यास करून मला मराठीद्वेशी ठरविण्याचा प्रयत्न केला जात आहे', असा आरोप आझमी यांनी मनसेचे नाव न घेता केला आहे.

शिवसेना सोडायची त्यांनी खुशाल जावे : शिवसेनाप्रमुख
मुंबई, ता.5 : ""आम्ही अस्वलासारखे आहोत. अस्वलाच्या अंगावरचा एक केस गळाला म्हणून काय फरक पडतो? शिवसेनेतून ज्यांना जायचे त्यांनी खुशाल निघून जावे; परंतु महापालिकेवरचा भगवा कोणत्याही स्थितीत खाली खेचू देणार नाही'', असा ठाम विश्वास शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आज येथे व्यक्त केला.
शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांना "शिवसेना भवना'त तब्बल 35 मिनिटे मार्गदर्शन करून बाळासाहेबांनी या आमदारांचा आत्मविश्वास वाढविला. त्यांना संबोधित करताना शिवसेनाप्रमुख म्हणाले, ""विधानसभा निवडणुकीतील अनेक जय-पराजय आम्ही पचवले आहेत. त्यातून तावून-सुलाखून निघालो आहोत. तुम्ही जरी 44 आमदार असलात तरी मी तुमच्याकडून 88 आमदारांचे काम करून घेईन. समुद्राला चंद्रबळानुसार भरती-ओहोटी येत असते. चंद्रबळ म्हणजे जनताजनार्दन आहे. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला ओहोटी आली आहे; पण याच चंद्रबळावर एक दिवस शिवसेनेला भरती येईल, असा विश्वास मला आहे.''
"मराठी माणसाविषयीच्या वक्तव्याचा विपर्यास'
"शिवसेना भवन'कडे येताना दुकानांच्या अनेक पाट्या मराठीत दिसल्या. येथे असणाऱ्या इंग्रजी पाट्यांना त्यावेळी मी स्वत: काळे फासले होते, अशी जुनी आठवण सांगून ""नारायण राणे यांना त्यांच्या कारभारामुळेच मी बाहेर काढले. आता सरमळकरही त्याच वाटेने गेले आहेत'', असे ठाकरे म्हणाले. मराठी माणसाने शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला, असे मी कधीही म्हणालो नव्हतो, असे त्यांनी स्पष्ट केले. शेजारीच बसलेल्या खासदार आणि "सामना'चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्याकडे वळत, ""मी असे कधी म्हणालो होतो का?'' अशी पृच्छा त्यांनी केली. त्यावर राऊत यांनी, ""तुम्ही असे कधी म्हटले नव्हते. मराठी माणसाने पाठ फिरवली एवढेच तुम्ही म्हणालात. मीडियाने त्याचा विपर्यास केला'' असे राऊत म्हणाले. बाळासाहेबांनी प्रसिद्धिमाध्यमांना यावेळीही लक्ष्य केले. सध्या प्रसिद्धिमाध्यमांनी आपल्या विरोधात भूमिका घेतल्याचा आरोप त्यांनी केला.
चौकट...
टोले आणि चिमटे
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी बाहेर पडलेल्या सेनेच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांचा नामोल्लेख बाळासाहेबांनी यावेळी केला. मात्र त्यात गजानन कीर्तिकर यांचा उल्लेख करण्याचे राहून गेल्याचे लक्षात येताच बाळासाहेबांनी कीर्तिकर यांनीही थोडा-थोडा प्रचार केला, त्यांचे नाव घ्यायचे राहून गेले. नाव घेतले नाही तर ते सोडून जातील, असा टोला लगावला. शिवसेना नेते मनोहर जोशी यांनाही त्यांनी चिमटा काढला.

एसएनडीटी विद्यापीठाच्या गोंधळाचा विद्यार्थ्यांना फटका
ऐनवेळी प्रश्नपत्रिका तयार करून परीक्षा उरकली
ंमुंबई, ता. 9 : एसएनडीटी विद्यापीठाच्या दूरस्थ शिक्षण विभागाच्या तुघलकी कारभाराचा चांगलाच फटका आज विद्यार्थांना बसला. "पोस्ट ग्रॅज्युएट अर्ली चाईल्डहूड एज्युकेशन' या अभ्यासक्रमाच्या प्रथमसत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका वेळेत उपलब्ध न झाल्याने तब्बल चार तास विद्यार्थ्यांना परीक्षागृहाबाहेर ताटकळत बसावे लागल्याने मनस्ताप सहन करवा लागला.
एसएनडीटी विद्यापीठाच्या दूरस्थ शिक्षण विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या "पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा अर्ली चाईल्डहूड एज्युकेशन' शाखेत 13 विद्यार्थिनींनी प्रवेश घेतला आहे. या पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथमसत्राची लेखी परीक्षा आजपासून (ता. 9) सुरू झाली. परीक्षा विभागाने याबाबतचे वेळापत्रक सुमारे पंधरा दिवस आधीच जाहीर केले होते, असे असताना आज पहिल्या पेपरलाच परीक्षा विभागाच्या गोंधळाचा फटका विद्यार्थ्यांना बसला. सकाळी 10.30 वाजता "चाइल्ड डेव्हलपमेंट' या विषयाची परीक्षा होती. मात्र सकाळी परीक्षागृहात पोहोचलेल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी परीक्षेची कोणत्याही प्रकारची तयारी नसल्याचे दिसून आले. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता परीक्षा होणार नाही, असे सांगण्यात आले. त्यामुळे चिडलेल्या विद्यार्थ्यांनी तेथेच ठिय्या दिला आणि परीक्षा घेतली नाहीतर आंदोलन करण्याचा इशारा दिला. तर काही विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडे धाव घेतली. त्यामुळे परीक्षा विभागाने ऐनवेळी धावाधाव करून नव्याने प्रश्नपत्रिका तयार करून दुपारी दोन वाजता कशीबशी परीक्षा उरकून घेतली, अशी माहिती एका विद्यार्थिनीने दिली.
दरम्यान "ज्या प्राध्यापकांनी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका तयार केल्या होत्या ते सध्या दूरस्थ शिक्षण विभागात कार्यरत नाहीत. "चाइल्ड डेव्हलपमेंट' या विषयाच्या प्रश्नपत्रिका त्यांच्याकडेच राहिल्या आहेत. त्यामुळे नव्याने प्रश्नपत्रिका तयार करून परीक्षा घ्यावी लागली', अशी सारवासारव विद्यापीठाच्या दूरस्थ शिक्षण विभागाचे संचालक चंद्रकांत पुरी यांनी "सकाळ'शी बोलताना केली.
विद्यापीठाच्या या गोंधळी कारभारामुळे विद्यार्थ्यांना झालेल्या मनस्तापाला जबाबदार कोण, असा सवाल केला जात असून विद्यापीठाच्या कारभाराविरोधात आंदोलन करण्याचा इशारा मनविसेचे सरचिटणीस गजानन काळे यांनी दिला आहे

Subscribe to:
Posts (Atom)