मंत्र्यांनीच वाचला अपयशाचा पाढा
ंमुंबई, ता. 2 : राज्य शासनाचा दुग्धविकास विकास विभाग डबघाईला आला आहे, अशा स्पष्ट शब्दात सरकारच्या अपयशाची कबुली देत दुग्धविकास मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाकडे मदतीची मागणी केली.
ंमहानंद दुग्ध शाळेच्या टेट्रोफिनो प्रकल्पाचे भूमिपूजन आज गोरेगाव येथे राऊत यांच्या हस्ते झाले. यानंतर झालेल्या कार्यक्रमात बोलताना राऊत यांनी स्वतःच्याच खात्याचे अपयश मांडले. "राज्य सरकारच्या दुग्धविकास खात्याची अवस्था चिंताजनक आहे. त्याला पुनरुज्जीवित करण्याची गरज असून त्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाने घ्यावी', असे आवाहन त्यांनी या वेळी केले.
""शासनाच्या "आरे' व महासंघाच्या "महानंद' यांनी एकमेकांशी स्पर्धा न करता एकत्रित काम करावे. महाराष्ट्र दूधपुरवठ्यात अन्य राज्यांच्या मागे आहे. आता केवळ पश्चिम महाराष्ट्राच्या जीवावर राहता येणार नाही. पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे विदर्भ, मराठवाडा, कोकण, खानदेश येथेही दुग्धविकास व्हावा. दुग्ध संकलन व्हावे यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाने पुढाकार घ्यावा,'' असे सूचित केले. तर दुग्धविकास राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांनी ""शासनाचा "पावडर फ्लान्ट' महासंघाने चालवायला घ्यावा'', असा प्रस्ताव मांडत शासन सर्वच पातळीवर अपयशी ठरल्याचे मान्य करीत राऊत यांच्या सुरात सूर मिसळला.
एकेकाळी डबघाईला आलेल्या महानंदला आता ऊर्जितावस्था आली असून महानंदच्या ब्रॅण्डखाली आज महासंघाने रसगुल्ले, सोनपापडी, गुलाबजाम हे दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीचा शुभारंभ पशुदुग्ध आणि मत्स्यव्यवसाय खात्याचे सचिव राजेश अग्रवाल यांच्या हस्ते केला. तसेच विस्तारित कामगार भवनाचे उद्घाटन देवकर यांच्या हस्ते झाले. महासंघाचे अध्यक्ष विनायक पाटील यांनी "आरे'च्या स्टॉलवर महानंदाची उत्पादने ठेवावीत, अशी मागणी केली. टेट्रोफिनोच्या माध्यमातून ग्राहकांना भेसळविरहित दुधाचा पुरवठा होईल, असा दावा केला. या प्रकल्पासाठी 16 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली असून 6 महिन्यांत हा प्रकल्प मार्गी लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
...........
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment