रिडालोस तोंडघशी? 15 नावांची घोषणा
मुंबई, ता. 21 : रिपब्लिकन डाव्या लोकशाही समितीचा घटक पक्ष असलेल्या भाकपने विधानसभा निवडणुकीसाठी आज 15 उमेदवारांची घोषणा केली. यवतमाळच्या कलावती बांदूरकर यांना रिडालोसने काल पाठिंबा जाहीर करीत वणी मतदारसंघ सोडण्याची तयारी दर्शविली होती; मात्र भाकपने येथून कॉ. अनिल घाटे यांना उमेदवारी जाहीर केल्याने रिडालोसच्या नेत्यांवर तोंडघशी पडण्याची वेळ आली आहे.
यवतमाळमधील वणी मतदारसंघ विदर्भ जनआंदोलन समितीच्या पाठिंब्यावर उभ्या राहणाऱ्या कलावती बांदूरकर यांना देण्यास तयार असल्याचे रिडालोसच्या नेत्यांनी काल जाहीर केले होते. रविवारी घाईघाईत त्यांना नेत्यांनी पाठिंबा जाहीर केला. वणी मतदारसंघ कलावतींसाठी सोडण्याची विनंती "भाकप'ला करू, अशी ग्वाही नेत्यांनी दिली होती; मात्र आज भाकपने वणीतून कॉ. अनिल घाटे यांना उमेदवारी जाहीर करून रिडालोस नेत्यांना तोंडघशी पाडले. कलावती यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कॉंग्रेसवर गोळी झाडण्याच्या प्रयत्नात असलेल्या "रिडालोस'च्या नेत्यांना त्यामुळे चपराक बसली असून आता ते काय भूमिका घेणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत रिडालोस नेते आमदार जयंत पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की अजून आमची "भाकप'शी चर्चा झालेली नाही; मात्र या प्रश्नी तोडगा काढला जाईल.
भाकपचे आज जाहीर झालेले उमेदवार पुढीलप्रमाणे : धामणगाव- तुकाराम भस्मे, तिवसा- साबीर हुसेन, आर्वी- प्रा. राजू गोरडे, साकोली- चंद्रशेखर टेंभुर्णी, औरंगाबाद मध्य- अशफाक सलामी, शेवगाव- ऍड. सुभाष लांडे, भोसरी कॉ. सुकुमार दामले, चोपडा- मधुकर साळुंखे, शिरपूर- रामचंद्र पावरा, कोल्हापूर शहर- दिलीप पवार, पलूस-कडेगाव- डॉ. श्रीकांत जाधव, डोंबिवली- काळू कोमास्कर, चारकोप- अखिलेश गौड, शिवडी- कॉ. नारायण घागरे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment