ंमुंबई, ता. 28 : शिवसेनेचो विश्वासघात करणाऱ्या गद्दारांचो बदलो घेवची आणि बदल घडवूची वेळ इली आसा. शिवसैनिकांनी कोकणात गावाकडे जावून लोकांका जागवूक व्हया, असे आवाहन शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी आज केले. दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईत झालेल्या सिंधुदुर्गवासीय मुंबईकर शिवसैनिकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. महसूलमंत्री नारायण राणे यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात देण्याचा निर्धार शिवसैनिकांनी या वेळी केला.
कोकणातील गावा-गावातील मतांवर मुंबईकर चाकरमान्यांचा पगडा मोठा असतो. चाकरमान्यांचा शब्द सहसा खाली पडू दिला जात नाही. त्यामुळेच निवडणुका आल्या, की मुंबईतले चाकरमानी क्रियाशील होतात आणि आपल्या गावाशी संपर्क ठेवून असतात. विधानसभा निवडणूक शिवसेनेसाठी कोकणात मोठे आव्हान असल्याने मुंबईकर चाकरमानी सक्रिय झाले आहेत. मुंबईकर शिवसैनिकांनी शिवसेनेला सिंधुदुर्गात पूर्वीचे वैभव प्राप्त करून देण्याचा निर्धार केला आहे. नारायण राणे यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दहशत संपली आहे. या दहशतीचा पगडा झुगारून शिवसैनिकांनी काम करावे व गद्दाराला धडा शिकवावा, असे आवाहन शिवडी विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख गजानन चव्हाण यांनी केले.
राणे यांच्या राजकारणाला स्थानिक जनता विटली आहे. कोकणाला उद्ध्वस्त करणारे खाण प्रकल्प आणल्याने लोकांच्या मनात राग आहे. लोकांना जिल्ह्यात बदल हवा आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि खुद्द कॉंग्रेसमधील पदाधिकारी व कार्यकर्ते त्यांच्या विरोधात आहेत. या संधीचा फायदा घेऊन राणे यांना धडा शिकविण्याची वेळ आली आहे, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.
नारायण राणे यांच्या विरोधात कुडाळ मतदारसंघातून लढणारे वैभव नाईक व सावंतवाडीचे उमेदवार शिवराम दळवी यांना विजयी करण्याचा निर्धार या वेळी करण्यात आला. या वेळी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समाजकारणासाठी राजकारणात
समाजकारणासाठी राजकारणात आलो आहे. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यातील संवेदनशील माणूस पाहिला आणि त्यांचे हात बळकट करण्यासाठी राजकारणात आलो, असे माहीम येथील शिवसेनेचे उमेदवार अभिनेते आदेश बांदेकर यांनी या वेळी सांगितले. जिथे अन्याय दिसेल तेथे हा आदेश आक्रमक होईल, असे त्यांनी ठासून सांगितले.
-----------------------
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment