Wednesday, December 23, 2009

कॉंग्रेस आघाडीतील बंडखोरांना रिडालोसची रसद

40 मतदारसंघांसाठी तिसऱ्या आघाडीकडे उमेदवारच नाहीत

मुंबई, ता. 6 : कॉंग्रेसच्या विरोधात हाळी देत विधानसभा निवडणुकीच्या रणमैदानात उतरलेल्या "रिडालोस'ने कॉंग्रेसच्या चार बंडखोर उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला आहे. विशेष म्हणजे जागावाटपाचा घोळ आणि घटक पक्षांच्या स्थानिक तडजोडी यामुळे रिडालोसला विधानसभेच्या 40 जागांवर उमेदवार उभे करण्यात अपयश आले आहे.

कॉंग्रेस आणि प्रस्थापित पक्षांच्या विरोधात "रिडालोस'ने दंड थोपटले आहेत. विधानसभेच्या 288 जागा लढण्याचे मनसुबे रिडालोसने आखले होते. मात्र काही घटक पक्षांनी स्थानिक पातळ्यांवर केलेल्या तडजोडीमुळे अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत जागावाटपाचा घोळ सुटला नाही. परिणामी राज्यातील 40 मतदारसंघात "रिडालोस'ला उमेदवार उभे करता आले नाहीत. यामध्ये राजुरा, वणी, कन्नड, बागलाण, येवला, धुळे ग्रामीण, सिंदखेड, जळगाव शहर, एरंडोल, जामनेर, मुक्ताईनगर, मलकापूर, खामगाव, अकोट, बाळापूर, रिसोड, मोर्शी, तुमसर, अमरावती, गडचिरोली, अहेरी, बोरिवली, दिंडोशी, भिवंडी ग्रामीण, भांडुप पश्‍चिम, जोगेश्‍वरी पूर्व, कांदिवली पूर्व, मलबार हिल, श्रीवर्धन, नेवासा, केज, औसा, उमरगा, कराड दक्षिण, शाहूवाडी, शिराळा, तासगाव- कवठेमहांकाळ, जत आणि वर्धा या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. रिपब्लिकन युनायटेडला 11 ठिकाणी; तर समाजवादी पक्षाला पाच मतदारसंघांत उमेदवारच मिळू शकले नाहीत. राष्ट्रीय समाज पक्षालाही चार जागांवर उमेदवार मिळू शकले नाहीत. त्यामुळे 17 पक्षांच्या या आघाडीला सर्व 288 जागांवर उमेदवार उभे करणे शक्‍य झाले नाही.
याची कसर भरून काढण्यासाठी रिडालोसने 10 जागांवर कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस व अन्य पक्षातील बंडखोरांना पाठिंबा जाहीर केला आहे. पक्षाच्या विरोधात शड्डू ठोकून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या कॉंग्रेसच्या बंडखोरांना रसद पुरवून कॉंग्रेसला शह देण्याचा प्रयत्न "रिडालोस'च्या नेत्यांनी केला आहे.
अमरावती मतदारसंघातील कॉंग्रेसचे बंडखोर व अर्थ राज्यमंत्री सुनील देशमुख यांना रिडालोसने पाठिंबा दिला आहे. राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे पुत्र रावसाहेब शेखावत यांना कॉंग्रेसने उमेदवारी दिल्याने देशमुख यांनी बंडाचे निशाण फडकावत कॉंग्रेसपुढे आव्हान निर्माण केले आहे. सिंदखेड मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी मंत्री हेमंत देशमुख यांच्यासह वर्धा येथील कॉंग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार सुरेश देशमुख आणि कॉंग्रेसचे माजी खासदार अनंतराव देशमुख यांना रिडालोसने पाठबळ पुरविले आहे. त्यामुळे या मतदारसंघात कॉंग्रेसच्या उमेदवारांसमोर आव्हान उभे ठाकले आहे. चाळीसगावमध्ये भाजपचे बंडखोर एम. के. अण्णा पाटील, कागलमधील संजय मंडलिक, कोल्हापूर दक्षिणमधील धनंजय महाडिक, इस्लामपूरमध्ये वैभव नायकवडी, बडनेरामध्ये रवी राणा; तसेच गडचिरोली, आदेरी, कराड दक्षिण येथील अपक्ष उमेदवारांनाही रिडालोसने पाठिंबा
.............

No comments: