Thursday, July 30, 2009

ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेलामुंबई विद्यापीठाचा

मुंबईता. 30 : मुंबई विद्यापीठाने गेल्या वर्षी प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेल्या ऑनलाइन प्रवेश प्रकियेत मोठ्या प्रमाणावर अडचणी जाणवल्याने या वर्षी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया न राबविण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ शिक्षण विभागाने घेतला आहे. दरम्यान, बी.एस्सी. आय. टी. विद्यार्थ्यांना जून 2009 मध्ये होणाऱ्या परीक्षेत ऑनलाइन हॉल तिकीट देण्यात येणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.विद्यापीठाच्या दूरस्थ विभागाच्या वतीने गतवर्षी कला, वाणिज्य, विज्ञान शाखेत तसेच विविध अभ्यासक्रमांसाठी दूरस्थ विभागाद्वारे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नियमित प्रवेश पद्धतीसह ऑनलाइन प्रवेश पद्धतीचा पर्याय उपलब्ध करून दिला होता; मात्र गेल्या वर्षी विद्यापीठात प्रवेश घेतलेल्या 70 हजार विद्यार्थ्यांपैकी केवळ 550 विद्यार्थ्यांनी ऑनलाइनचा पर्याय निवडून प्रवेश घेतला. ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना केवळ संगणक येऊन चालत नाही; त्यासाठी "नेटसॅव्ही' असण्याची गरज आहे. तसेच संगणकावरील अर्जावरच्या सूचना विद्यार्थी काळजीपूर्वक वाचत नाहीत. ऑनलाइन अर्ज भरायचा असल्याने विद्यार्थी गडबडून जातो, त्यामुळे तो चुकीची माहिती भरतो, क्‍लास, कॅटेगरी यांच्या संकल्पना त्यांना स्पष्ट होत नाहीत, डीडी नंबर आणि डीडीवरील एमआयसीआर नंबर यातील घोळ विद्यार्थ्यांच्या लक्षात येत नाही, त्यामुळे ते चुकीची माहिती भरतात, असे विद्यापीठाच्या निदर्शनास आले. त्यामुळे या वेळी ऑनलाइन प्रवेश पद्धतीला रामराम करण्याचे ठरविण्यात आले आहे.ऑनलाइन हॉल तिकीटबी.एस्सी. आय.टी.च्या पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने हॉल तिकीट देण्याची विद्यापीठाची नवी योजना आहे. पुणे विद्यापीठाने ऑनलाइन हॉल तिकीट देण्याची योजना राबविली होती; त्याला चांगले यश मिळाल्याने मुंबई विद्यापीठही हा प्रयोग करणार आहे. या माध्यमतून ऑनलाइन पद्धतीचीच एकप्रकारे पुनर्परीक्षा घेतली जाणार आहे.दरम्यान, गेल्या वर्षीचा राज्य सरकारच्या शिक्षण विभागाचा अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशाचा अनुभव चांगला नसताना सरकारने या वेळी पारंपरिक पद्धतीचा पर्याय न ठेवता केवळ ऑनलाइन प्रवेशावर मदार ठेवली आहे. ऑनलाइन प्रवेशात येणाऱ्या अडचणी लक्षात घेता त्याचा फटका अकरावी प्रवेशाच्या ऑनलाइन पद्धतीलाही बसू शकतो, असे मत विद्यापीठातील काही जाणकारांनी व्यक्त केले.

........

30/5/09

No comments: