Thursday, July 30, 2009

"एनर्जेटीक' प्रिया!

इंट्रोनिवडणूक जाहीर होण्यापूर्वी मी नियमित जिममध्ये जात होते. निवडणुकीच्या धबडग्यात आता वेळ मिळत नाही. पण अगोदर केलेल्या व्यायामाची एनर्जी मला आता उपयोगी पडते आहे. कार्यकर्त्यांची रीघ लागलेली असते. याचा प्रकृतीवर अनिष्ट परिणाम होऊ नये यामुळे दुपारी जड अन्न घेण्याचे टाळते. त्याऐवजी ज्यूस आणि एनर्जी ड्रिंक्‍स घेते.निवडणुकीच्या रणांगणात उतरल्यावर तब्येतीच्या आखाड्यात चितपट होऊन कसे चालणार. लोकसभा निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत उडी घेतलेल्या उमेदवारांसाठी प्रचाराचा ताण आणि स्वतःच्या तब्येतीची काळजी घेणे हे एकाच नाण्याच्या दोन बाजू बनल्या आहेत. या दोन्ही बाजू सांभाळल्या तरच काम होणार आहे. सूर्याच्या वाढत्या पाऱ्याने अंगाची काहिली होत असून, अशा स्थितीत सकाळपासून रात्रीपर्यंत प्रचार करताना उमेदवारांची कसोटी लागत आहे. उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील कॉंग्रेसच्या उमेदवार खासदार प्रिया दत्त यांनी अशा परिस्थितीशी सामना करण्यासाठी "ज्यूस आणि एनर्जी ड्रिंक्‍सला' पसंती दिली आहे.""प्रचाराच्या व्यापातून नेहमीप्रमाणे "जिम'साठी वेळ देता येत नाही. सकाळी 8 वाजल्यापासून प्रचारासाठी बाहेर पडावे लागते. रात्री 10 वाजेपर्यंत मतदारांशी, कार्यकर्त्यांशी भेटीगाठी सुरू असतात. या साऱ्या व्यापातून प्रकृतीकडे, खाण्याकडे लक्ष द्यायला वेळच नसतो. दुपारी एक तास थोडी विश्रांती मिळते, पण तेव्हाही कार्यकर्त्यांची रीघ लागलेली असते. प्रकृतीवर अनिष्ट परिणाम होऊ नये म्हणून दुपारचे जेवण होते. पण जड अन्न घेण्याचे टाळते. त्याऐवजी ज्यूस आणि एनर्जी ड्रिंक्‍स घेते. रात्री घरी गेल्यानंतर थोडा भात आणि रोटी खाणे पसंत करते'', असे त्या आपल्या डाएटची लिस्ट देताना सांगतात. निवडणूक सुरू होण्यापूर्वी त्या नियमित जिममध्ये जायच्या. निवडणुकीच्या धबडग्यात आता वेळ मिळत नाही, अशी खंत त्या व्यक्त करतात. पण अगोदर केलेल्या व्यायामाची एनर्जी मला आता उपयोगी पडते, असे सांगण्यासही त्या विसरत नाहीत. प्रिया दत्त म्हणतात, मतदारांच्या भेटीसाठी गेल्यानंतर सगळ्यांकडून उत्साहात स्वागत होते. चहा, कॉफीचा आग्रह होतो. मतदारांचा आग्रह मोडवत नाही आणि सर्वांचाच आग्रह पूर्ण करणेही शक्‍य नसते. अशा वेळी अवस्था फारच बिकट होते. ..........

No comments: